Share

Girish Mahajan | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्यांची उपस्थिती? गिरीश महाजनांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) पक्षात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट अशे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. मात्र शिंदेंचा हा पहिला दसरा मेळावा असल्याने भाजप नेते या मेळव्यात उपस्थित राहणार का असा सवाल अनेकांना होता. याचं उत्तर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलं आहे.

गिरीश महाजन यांनी दिलं उत्तर :

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाजप नेते जाणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात काही चर्चा झाली असेल तर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंचं विधान :

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील दसरा मेळाव्यावरुन विधान केलं होतं. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला निमंत्रण दिलं तर मी दसरा मेळाव्याला जाईल मात्र, ते मला आमंत्रण देणार नाहीत, हे मला माहिती असल्याचं राणे म्हणाले होते.

मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु होती. मात्र, याचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला आणि शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. तरी या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती.

दसरा मेळाव्याच्या वादात शरद पवारांची उडी :

यादरम्यान, दसरा मेळावाबाब विधान केल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) नुकत्याच जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांबाबत देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आमदार रमेश लाटके यांच्या निधनामुळे अंधेरीतील जागेसाठी निवडणुका होणार आहेत, यामध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा उद्धव ठाकरेंनाच असेल, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Sinde) यांच्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) पक्षात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट अशे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now