यशवंत सिन्हांचे शेतकरी आंदोलन अखेर मागे

अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याची माहिती भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी दिली आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणारे आंदोलन मागे घेण्याची घोषणाही सिन्हा यांनी केली आहे.

यशवंत सिन्हांचे विदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन

भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा हे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. सिन्हा यांच्याशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. यशवंत सिन्हा यांच्यासह जवळपास २५० शेतकऱ्यांना अकोला येथून अटक करण्यात आली होती. तर जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी केला होता. दरम्यान आता तात्कालिक मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्याची घोषणाही सिन्हा यांनी केली आहे