सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू, भाजपा नेत्याचा इशारा

मुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणे काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंग सिध्दू यांना चांगलंच महागात पडताना दिसत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू असा इशारा दिला आहे.

माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली. त्यानंतर आता सिद्धूवर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपाच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्यांमुळे बळींची संख्या जास्त- सुप्रीम कोर्ट

नेमकं काय म्हणाले मोहम्मद फारुख आजम ?
आम्ही जागोजागी धरणं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत सिद्धूला अटक होत नाही, तोपर्यंत हे सुरू राहणार आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. सिद्धू जर मुंबईत आला तर त्याचे हात-पाय तोडून टाकू.

दरम्यान, सिध्दू यांच्याविरोधात मुजफ्फरपुरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आलाय. याचिकाकर्ते अधिवक्ता सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केलाय. पाकिस्तानचे सेनाप्रमुखांची गळाभेट घेतली त्यामुळे भारताचा अपमान केलाय असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

‘मुस्लिम नसूनही मला अजानच्या आवाजाने जाग येते’ सोनू निगमच्या ट्विटने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

भाजपनेही सिध्दू यांच्या या कृत्याचा सडकून टीका केली. तसंच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही सिध्दू यांच्या जाण्यावर नाराजी व्यक्त केली होती.