भाजपा नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह

uma bharti

दिल्ली : माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. उमा भारती यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी प्रशासकीय पथकास याबाबत माहिती देऊन बोलवून घेतले व स्वतःची तपासणी करून घेतली आहे. सध्या ऋषिकेश आणि हरिद्वारच्या मध्यात असलेल्या एका ठिकाणी त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे.

मी तुमच्या माहितीस्वत हे सांगत आहे की, मी आज माझ्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी प्रशासनास आग्रह करून स्वतःची करोना टेस्ट करून घेतली. कारण, मला तीन दिवसांपासून ताप होता. मी हिमालय यात्रेदरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे व नियमांचे पालन केले आहे. मात्र तरी देखील मी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. मी सध्या हरिद्वार व ऋषिकेश दरम्यान असलेल्या वंदे मातरम कुंज येथे क्वारंटाइन आहे, जे की माझ्या परिवारासारखेच आहे. चार दिवसानंतर पुन्हा तपासणी करून घेणार आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार आहे. अशी माहिती उमा भारती यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

याचबरोबर उमा भारती यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःची करोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन देखील ट्वटिद्वारे केले आहे. माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांना सर्वां माझे आवाहन आहे की, त्यांनी स्वतःची करोना टेस्ट करून घ्यावी व दक्षता बाळागावी, असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-