Share

Sudhir Mungantiwar | भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच सांगितला सरकार पडण्याचा मुहूर्त

Sudhir Mungantiwar | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकार सत्तेत आली. त्यानंतर विरोधकांनी हे सरकार कधी पडणार याबाबत अनेक भाकीत केलं. अशातच भाजप (BJP) पक्षाचे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वतः सरकार कधी पडणार याबाबत भाष्य केलं आहे.

ज्या दिवशी आम्ही जनतेची सेवा बंद करू, त्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार राहणार नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच, . 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेचा विचार हॅक करून सरकार बनवलं, पण जनता परीक्षा घेत असते, लोकांना सगळं कळतं, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, मला त्यांची मजबुरी लक्षात येतेय. त्यांच्या घरी जाणारा कार्यकर्ता संध्याकाळी तिथे जातो आणि रात्री शिंदे साहेबांच्या घरी.. हे कुणालाच माहिती नाही, असं प्रतय्ुत्तर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत खैरे यांना दिलं आहे.

राज्यशास्त्र हे शिकवतं की दोन महिन्यात सरकार जाईल, अशी अफवा पसरवायची… ज्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात इच्छा जागी होते, त्यांच्यासाठी ही एक अफवेची फवारणी आहे. ही अफवेची फवारणी कामी येणार नाही. सरकार एक , दोन महिना नाही तर अनेक वर्षे टीकेल जनतेची सेवा करेल, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sudhir Mungantiwar | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकार सत्तेत आली. त्यानंतर विरोधकांनी हे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now