‘एनआयए ही देशाची सर्वोच्च संस्था आहे, या संस्थेवर शंका घेणं योग्य नाही’

टीम महाराष्ट्र देशा : ‘एनआयए ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेवर शंका घेणं योग्य नाही. एनआयएवर शंका घेणं याचा अर्थ तुमच्या मनात भिती आहे,’ असे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘आपण एसआयटीची चौकशी लावायची आणि चार्ज फ्रेम होऊ द्यायचे नाही, अशी त्यांची इच्छा असावी. या प्रकरणाच्या तपासावर कोणतीही शंका उपस्थित करणं योग्य नाही,’ अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Loading...

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेली दंगल कोणीतीरी स्पॉन्सर केली असल्याचे ते म्हणाले. तसेच आमचं सरकार असताना शिवसेनाही सोबत होती. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनीही यावर भाष्य केलं होते. आता या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तपासात उघड होतील याची त्यांना भिती आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार येताच भीमा कोरेगाव प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी केली होती. तसे पत्र पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. पवारांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारीच आढावा घेऊन तपास अधिकाऱ्यांकडे पुरावे मागितले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'