पवारां विरोधात तेव्हाही लढलो, आता 2019 मध्येही लढेन – सुभाष देशमुख

सोलापूर: पक्षाने आदेश दिल्यास माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयार आहे. 2009 मध्ये आमची ताकद नसतानाही शरद पवार यांच्या विरोधात लढलो. आत्ता तर आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे कायम लोकांमध्ये असण्याचा फायदा होईल, म्हणत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातुन लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे 2009 प्रमाणे पवार विरुद्ध देशमुख हा सामना पुन्हा एकदा पहायला मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक काल पुण्यामध्ये पार पडली. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील तसेच वरिष्ठ नेत्यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असल्याचं पवार यांनी सांगितले. दरम्यान, माझी इच्छा नाही मात्र वरिष्ठ नेते आग्रह करत असल्याने निवडणूक लढवण्याचा विचार करेल, असेही त्यांनी सांगितले. पवार यांच्या सूचक इशाऱ्यामुळे ते माढ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.

Loading...

माढा लोकसभा मतदार संघातून यापूर्वी शरद पवार यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख यांनी त्यांना लढत दिली होती. मात्र यावेळी देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान बदलत्या राजकारणामध्ये सध्या सुभाष देशमुख हे सहकार मंत्री असल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे वजन वाढले आहे. त्यामुळे 2009 च्या तुलनेत यंदाची लढत अटीतटीची होऊ शकते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील