भाजप नेत्यांची डोकी ठिकाणावर आहेत का ? महिला पत्रकारांबद्दल केले ‘हे’ गलिच्छ विधान

टीम महाराष्ट्र देशा- भाजप नेत्यांची डोकी ठिकाणावर आहेत का ? असं विचारण्याची सध्या वेळ आली आहे कारण, अभिनेते, संहिता लेखक आणि भाजपचे नेते एस.व्ही. ई. शेखर व्यंकटरमन यांनी एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर करून मोठ्या लोकांसोबत शरिरसंबध ठेवले नाहीत तर पत्रकार होता येत नाही असा दावा केला आहे. टीकेची झोड उठू लागताच एस.व्ही. ई. शेखर व्यंकटरमन यांनी हि वादग्रस्त पोस्ट डिलीट करून टाकली.

Loading...

तामिळनाडूत राज्यपालांनी महिला पत्रकाराच्या गालाला हात लावून कुरवाळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एस.व्ही. ई. शेखर व्यंकटरमन यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली. या पोस्टवरून सध्या मोठा वाद सुरु आहे.

फेसबुकवर पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं होत एस.व्ही. ई. शेखर व्यंकटरमन यांनी ?

महिला पत्रकाराच्या गालाला स्पर्श केल्यानंतर राज्यपालांनीच फिनाईलने हात धुवायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपालांना बदनाम करण्यासाठीच संबंधित महिलेने आरोप केले आहेत. मोठ्या लोकांसोबत शरिरसंबध ठेवले नाहीत तर पत्रकार होता येत नाही…अशिक्षित आणि मुर्ख, कुरुप असलेल्या लोकांची संख्या तामिळनाडू माध्यमात जास्त आहे. ही महिला पत्रकारही त्याला अपवाद नाही.अनेक विद्यापीठे आणि माध्यमांमध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पण, कोणीही याचा जाब राज्यपालांना विचारत नाही?

त्यांच्या या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्याने सावध झालेल्या शेखर यांनी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवरून डिलीट केली.

सध्या तामिळनाडू मध्ये सेक्स फॉर डिग्री या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी ‘ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी असल्यानं तामिळनाडूसह देशभरात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाने देखील या सर्व वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.

हे प्रकरण गाजत असतानाच राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केल्यानंतर ते पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. यानंतर महिला पत्रकारानं ट्विट करत याबद्दल मोठा संताप व्यक्त केला आहे. ‘पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,’ असं महिला पत्रकारानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या वादानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सदर महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम यांना पाठवलेल्या आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, मी तुम्हाला माझ्या नातीसमान मानून गालाला हात लावला होता. मी पत्रकार म्हणून तुमचे कौतुक करण्याच्या इराद्याने असे केले होते. कारण मी स्वत: 40 वर्षे पत्रकार म्हणून काम केले आहे. या प्रकरणी लक्ष्मी यांनी माफीनामा स्वीकार केला असला तरी बनवारीलाल पुरोहित यांनी त्या कृतीमागे मांडलेला तर्क अमान्य केला आहे.

 

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...