भाजपकडे जमा झालेल्या ७५० कोटींचा निधी ‘वाझे’ने गोळा केलेला नाही; भाजप नेत्याचा पलटवार !

bjp vs thackeray

मुंबई : २०१४ लोकसभा निवडणुकांपासून भाजपने केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली. सध्या भाजप हा देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. २०१४ पासून काँग्रेसला लागलेली उतरती कळा ही २०१९ मध्येही कायम राहिली. आणि भाजपने २०१४ हुन अधिक जागा मिळवत च्या मोदी सरकार २.० ची स्थापना केली. भाजपला सत्तेसह आर्थिक स्वरूपात देखील मोठा फायदा झाला आहे.

२०१९-२० मधील देणग्यांच्या माहितीनुसार भाजपला आलेल्या देणग्यांची रक्कम ही जवळपास काँग्रेसच्या पाच पट आहे. २०१९-२० या वर्षात भाजपला तब्बल ७५० कोटी रुपयांची रक्कम देणगी मिळाली आहे. तर, याच काळात काँग्रेसला १३९ कोटी रुपये इतकी रक्कम देणगी म्हणून मिळाली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. भाजपला मिळालेल्या देणगीवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

भाजपच्या देणगीदारांवर आणि मूळ रकमेवर संशय व्यक्त करतानाच शिवसेना श्रीमंत पक्षांच्या यादीत नसली तरी लोकांचा पाठिंबा या एकमेव श्रीमंतीवर शिवसेना गेल्या पन्नास वर्षांपासून मैदानात लढतेच आहे, असं देखील सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या टीकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘भाजपला मिळालेल्या ७५० कोटीच्या देणग्या पक्षाच्या खात्यात जमा झाल्या आहेत. या देणग्या ‘वाझे’ने गोळा केलेल्या नाहीत. कोणताही कामधंदा न करता कोट्यवधींची माया आणि महागड्या गाड्या जमा करण्याएवढे भाजप नेतृत्व हुशार नाही,’ अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला उपरोधिक टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP