मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यूप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी शेलार यांच्यावर IPC कलन ३५४ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे शेलार यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, कायदा हा सर्वांना समान आहे, आशिष शेलार यांना वेगळा आणि संजय राऊत यांना वेगळा कायदा असं करता येणार नाही. केवळ महाविकास आघाडी सरकारचा नेता आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगळे कायदे आणि इतरांना वेगळे कायदे असं करणं योग्य ठरणार नाही. मात्र असं केलं तर मात्र पूर्ण मुंबईतून भाजप कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित होतील आणि त्यानंतर जे होईल त्याला पोलिस जबाबदार असतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
भाजप नेते आशीष शेलार यांनी जे काही वक्तव्य केलं त्यानंतर लगेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याच सोबत त्यांनी माणसं देखील पाठवले. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार दबाव आणून ही कारवाई करत आहे. तसेच हे सरकार आशिष शेलार यांच्यावर होणारी ही कारवाई दबावाने आणि सूडबुद्धीने केली जाणारी कारवाई आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीबाबत केले मोठे वक्तव्य
- ‘सर्वांनी दूसरा डोस घ्या अन्यथा…’; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे मोठे विधान
- एक जागा तीन दावेदार…कोण असणार एकदिवसीय संघाचा उपकर्णधार?
- शशिकांत शिंदेंच्या ‘त्या’ टीकेवर शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर; म्हणाले,’तुम्हाला थंड करून…’
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<