मुंबई: सध्या देशात निवडणुकांचे (Elections) वारे वाहत आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपुर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सगळे पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यात आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. गोव्यात आता कॉंग्रेस साथ देत नसल्यास स्वबळावर लढण्याची देखील आता शिवसेनेने तयारी दाखवली आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) या भूमिकेवर भाजप (BJP) सातत्याने टीका करत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती त्याच सोबत भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात वाक्युद्ध सुरूच आहे. आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील ट्विट करत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
लढवायला 300 जागा ही शिवसेना लढवू शकेल, परंतु आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहता महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचे डिपॉझीटच जप्त झाल्याचेच चित्र सर्व ठिकाणी आहे. तशीच परिस्थिती यूपी आणि गोव्यातही होईल हे येणारा काळ दाखवेल.@CMOMaharashtra @rautsanjay61 #UPElections2022 #GoaElections pic.twitter.com/BNFYK1ZNCC
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 14, 2022
प्रविण दरेकर (Pravin Darekar) ट्विट करत म्हणतात, लढवायला ३०० जागा ही शिवसेना लढवू शकेल, परंतु आतापर्यंतचा त्यांचा इतिहास पाहता महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचे डिपॉझीटच जप्त झाल्याचेच चित्र सर्व ठिकाणी आहे. तशीच परिस्थिती यूपी आणि गोव्यातही होईल हे येणारा काळ दाखवेल, अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबईत ओमायक्रॉनची लाट? टास्क फोर्स म्हणते…
- काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान मोठी चळवळ म्हणून उभी करा; काँग्रेस सरचिटणीस ओझांचे आवाहन..!
- अचानक ठरलेल्या लग्नाबद्दल सांगताना, मोहित रैनाला झाली पहिल्या भेटीची आठवण
- ‘कॉंग्रेसचा उत्तर प्रदेशमधला प्रयोग महाराष्ट्रातही करणार’; नाना पटोलेंची घोषणा
- ‘बरं झालं यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली नाही’; नवाब मलिकांचा मोदींना टोला