Share

BJP | “उद्धव ठाकरे, भास्कर जाधवांचा बदला घेतल्याशिवाय…”; ‘या’ भाजप नेत्याचा ठाकरे गटावर हल्ला

BJP | मुंबई : ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ 18 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे  (Narayan Rane)आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) पक्षाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर चांगलाच पलटवार वार केला आहे.

 काय म्हणाले प्रसाद लाड (Prasad Lad)

भाजपकडून संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले आहे. भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याशिवाय गप्प राहायचे नाही, असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रसाद लाड म्हणाले, संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही ज्यांनी आणीबाणी रॅली काढली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कसली आणीबाणी रॅली काढता. तुम्ही चिंधीचोर आहात. तुमच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. आपण त्यांचे नावही घ्यायला नको. आपण वैभव नाईक यांचे नाव चिंधीचोर ठेवुया. तर भास्कर जाधव यांचं नाव आयटम गर्ल ठेवुया. मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं. ते खूप नाटक करतात. चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर योग्य टीका केली आहे. या लोकांची नावे घेऊन आपण त्यांना मोठं करायचं नाही.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असते. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत. ते विधानसभेत एक बोलतात. बाहेर एक बोलतात. एवढीच ताकद होती, तर तुम्हाला (भास्कर जाधव) उद्धव ठाकरे यांनी मंत्री का केले नाही. भास्कर जाधव उदय सामंत यांच्या पाया पडत होते. आज ते आम्हाला शिकवत असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

BJP | मुंबई : ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now