Pankaja Munde । मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “मी अब्दुल सत्तारांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने महिलेविषयी किंवा पुरुषांविषयी आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे, असं माझं मत आहे. जर टीकेची पातळी घसरत असेल तर ती अयोग्य आहे” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वक्तव्याचा निषेध करत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले, “कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही.सत्तार साहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?”
काय आहे प्रकरण?
तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही काय सांगाल? असं अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिलीय. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं असल्याचा हा व्हिडीओ आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar vs NCP | “अब्दुल सत्तार भिकाऱ्यांच्या यादीत, जीभ छाटू” ; सुप्रिया सुळेंना शिवी दिल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक!
- Rohit Pawar | अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवार आक्रमक; म्हणाले…
- T20 World Cup | तडाखेबाज फलंदाजी करत ‘विराट कोहली’ने पटकावला आणखी एक पुरस्कार
- Nilesh Rane | “काही माणसंच नीच असतात, लायकी असेल तर मुलाला…”, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- Sushma Andhare | कुठलंही विक्टीम कार्ड न ठेवता तुमचा माज मी उतरवेन ; सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांना इशारा