पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

pankaja munde

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ३ जून रोजी पुण्यतिथी असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्ताने कार्यक्रम होणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यक्रम लाइव्ह होणार असून कोणीही गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे.

‘पुण्यतिथी साध्या पद्धतीनं साजरी होणार आहे. ‘कार्यकर्त्यांनीही घरात राहूनच पुण्यतिथी साजरी करावी. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे दोन दिवे लावावेत आणि मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ घरात बनवावा,’ असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नदान, रक्तदान, मास्क व इतर औषधांचे वाटप करावे आणि हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवावे, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

काय लिहिलं आहे पोस्टमध्ये –

“३ जून” तसं मी या दिवसाची वाट अजिबात पाहत नाही. अगदी २ जून २०१४ ला जाऊन थांबावं असं वाटतं. २ जूनला आनंद, उत्साह, समाधान होतं. बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते. तेच अखेरचं जेवणं त्यांचं स्वत:च्या घरी….मग पार्थिवदेखील घऱी आणता आलं नाही…म्हणून ३ जून उजाडलाच नाही पाहिजे असं वाटतं.

तसं ३ जूनचा दिवस संघर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असता. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी करोनामुळे काळजी आणि लॉकडाउनच्या नियमांचं पालन करायचं आहे, ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही.

३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा.

पुणेकरांनो सावधान : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांनी ओलांडला सात हजारांचा टप्पा

मुख्यमंत्री दिसण्यापेक्षा काम दिसणे महत्त्वाचे; विरोधकांना CM ठाकरेंनी दिले रोखठोक प्रत्युत्तर

‘…त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे’

#coronvirus : राज्यात २,५९८ नवे कोरोनाबाधित; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर