‘नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात’, निलेश राणेंचा प्रहार

NILESH RANE SANJAY RAUT

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिलेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज उत्तर दिले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो.’

संजय राऊत यांच्या या विधानाचा आता भाजप नेते निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची.’ असा जोरदार घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP