महाराजांनी माफी मागितल्यानंतर विषय संपायला हवा होता;भाजपच्या बड्या नेत्याने घेतली इंदोरीकरांची भेट

indurikar maharaj

अहमदनगर: मनसे पाठोपाठ आता भाजपा नेत्यांनी देखील ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांची भेट घेतली आहे. भाजपच्या अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इंदोरीकर महाराजांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. आचार्य तुषार भोसले यांनी इंदोरीकरांच्या संगमनेरमधील ओझर गावी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर सडकून टीका केली. आता शिवसेनेचं हिदुत्व कुठं दिसतंय? असा थेट सवाल भोसले यांनी विचारला.

परीक्षेसंदर्भात राज्यपालांचा आग्रह चुकीचा! पुनर्विचार करण्याचा संजय राऊतांनी दिला सल्ला

तुषार भोसले म्हणाले, “इंदोरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेड्यापाड्यात पोहचवली. त्यांनी आपल्या कीर्तनात ग्रंथाच्या आधारे वक्तव्य केलं. या प्रकरणी इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता. काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठीशी आहे.” शिवसेना हिंदूत्ववादी होती. या चार-सहा महिन्यात शिवसेनेचा हिंदूत्वाद कुठे दिसतो? असाही सवाल भोसले यांनी विचारला.

राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार,राजू शेट्टी आक्रमक

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडून इतर कुणाला भेटायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणी राज्यपालांकडे मांडल्या आहेत. पुनश्च: हरिओमच्या नावाखाली दारुंच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरु केले. हरीला मात्र लॉक करुन ठेवलं आहे,” अशी टीका तुषार आचार्य यांनी सरकारवर केली.

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर

दरम्यान, काल मनसे नेते अभिजित पानसे यांनी देखील इंदोरीकर महाराजांची भेट घेतली होतो. अभिजीत पानसे म्हणाले, ‘एखाद्या छोट्या, अनावधाने केलेल्या वाक्यावरुन इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. त्यांनी माफीही मागितली आहे. इंदोरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे. शाळा चालवत आहेत, समाज प्रबोधनाचं मोठं काम विसरुन चालणार का? पक्ष, राजकारण यापलिकडे आपण पाहायला हवं’. आज सदिच्छा भेट घेतली असून सरकारने याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले.

सोलापुरातील लॉकडाऊनला आडम मास्तरांचा विरोध,रस्यावर उतरण्याचा दिला इशारा

तर, दरम्यान, निवृत्तीमहाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर गु्न्हे दाखल होऊ नये म्हणून यापूर्वी अनेक राजकारणी पुढे आले होते.मात्र तरीही  गुन्हा दाखल झाला. आता हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य वैभव पिचड यांनी रस्त्यावर येण्याची तयारी केली आहे. एव्हढेच नव्हे, वारकरी आंदोलन करतील आणि आपण त्यात अग्रभागी राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.