नोटाबंदीवर आक्रोश करणा-या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर लोटांगण – माधव भंडारी

सांगली : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नोटाबंदी व जीएसटी अशा ऐतिहासिक निर्णयाबाबत रस्त्यावर आक्रोश करणारी राजकीय नेतेमंडळी वर्षा बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे गोडवे गाऊन आमची कोणतीही प्रकरणे बाहेर काढू नका, अशी विनंती करतात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त सांगली जिल्हा भाजपच्यावतीने येथील कच्छी जैन भवनात आयोजित काळा पैसा व भ्रष्टाचार विरोधी दिन या विषयावरील व्याख्यानात माधव भंडारी बोलत होते.

नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीला केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच विरोधक जनआक्रोश करीत आहेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यात सुमारे दीड कोटी रूपये खर्चाची डिजीटल फलक उभारली गेली आहेत. मात्र या डिजीटल फलकांवरील कॉंग्रेस नेत्यांचे हसरे चेहरे पाहता छायाचित्रात कोठेही त्यांचा आक्रोश दिसत नाही. या नेत्यांचा हा आक्रोश सर्वसामान्य जनतेसाठी नव्हे, तर नोटाबंदी निर्णयामुळे त्यांना सहन कराव्या लागल्या त्रासाचा आक्रोश आहे. या जनआक्रोश मेळाव्यावर जितका पैसा विरोधकांनी खर्च केला, तोच पैसा सांगली जिल्ह्यातील शेतक-यांच्या बँक खात्यावर भरला असता, तर हजारो शेतकरी कुटुंबियांचा आक्रोश काही प्रमाणात का होईना थांबला असता, असा टोलाही माधव भंडारी यांनी लगावला.

Loading...

या निर्णयामुळे सुमारे ६६ लाख बँक खात्यांवर दोन लाख रूपयाहूनही अधिक रक्कम भरली गेली. या सर्व बँक खात्यांची सध्या पडताळणी केली जात आहे. दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम भरण्यात आलेली २० लाख बँक खाती आहेत, तर साडे तीन लाख बँक खात्यांवर एक कोटी रूपयापेक्षा अधिक रकमेचा भरणा झालेला आहे. आजअखेर तीन लाख कंपन्यांनी केवळ नोंदणी केली होती, त्यावर कोणतेही व्यवहार झाले नव्हते. मात्र या निर्णयानंतर या कंपन्यांच्या बँक खात्यावर कोट्यवधी रूपये जमा झाले. यातील ५६ हजार संशयास्पद कंपन्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे. नोटाबंदी निर्णयानंतर बँकांच्या ठेवीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी विविध कर्जांचे व्याजदर उतरले आहेत. या निर्णयामुळे लघु उद्योग वाढला असून अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली आहे, असा दावाही माधव भंडारी यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली