BJP | मुंबई : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर होते. यावरून सत्ताधारी पक्षनेते त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले भाजप (BJP) पक्षाचे नेते लक्ष्मण ढोबळे
उद्धव ठाकरे यांना घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात, असं म्हणत लक्ष्मण ढोबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. लक्ष्मण ढोबळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले आहे. कोकणातील अनेक घरं वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत नाहीत. त्यामुळे त्यांना करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात.
तसेच, एकीकडे शेतकऱ्यांची विचारपूर करण्यासाठी बाधांवर पोहोचलोय म्हणतात, दुसरीकडे १५ ते २० मिनिटांमध्ये दौरा आवरता घेतात. अडीच वर्ष सत्ता असताना एकही चांगलं काम कराव, असं त्यांना वाटलं नाही. आज शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. मात्र, हे त्यांना बघवत नसल्याचंही लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “सत्ताधारांची दिवाळी, सामान्य जनतेचं काय?”, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Aurangabad | एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
- Eknath Shinde | “…उद्भवजींचा दौरा तासाभरात झाला”, शिंदे गटाने काव्य करत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर साधला निशाणा
- Anushka Sharma | भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी खास पोस्ट, म्हणाली…
- Bacchu Kadu | “… अन्यथा मी ‘त्यांना’ कायम हि** म्हणेल”, बच्चू कडू संतापले