मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना टेस्ट का?, किरीट सोमय्यांचा सवाल

bjp leader kirit somaya question on dhananjay munde corona test

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज कोरोनावर मातकरून घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांची दोन वेळा कोरोना टेस्ट केली. मग सर्वसामान्यांची एकदाच टेस्ट का करण्यात येते, हा दुजाभाव का?, असा सवाल केला आहे.

गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पॉझिटिव्ह असतानाही लक्षण नसल्याने त्यांची दोनवेळा टेस्ट करण्यात आली होती.

दरम्यान, कमीत कमी चाचण्या करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र धनजंय मुडे हे एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या लक्षणं न आढळल्याने त्यांची पुन्हा टेस्ट करण्यात आली, मुंडे यांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. सामान्यांची मात्र एकदा टेस्ट करण्यात येते, हा दुजाभाव का? याच उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे देणार का ? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने कोरोनावर मात करण्यात यशस्वी – मुंडे

रुग्णालयातून घरी परतल्यानंतर मुंडे यांनी ट्विटकरत सर्वांचे आभार मानले आहेत. सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो. आज डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी काळजी घेतली. सगळ्यांचे मनापासून आभार, असं मुंडे यांनी म्हंटले आहे, हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपण कोरोनारुपी संकटावर नक्की मात करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.