मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटापर्यंत घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देर आये दुरुस्त आए …असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जुन्या ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर करत टीका केली आहे. तुम्ही खरे बोलता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.
@AUThackeray नेमके खरे कोण ? तुम्ही की उध्दव ठाकरे? कारण तुम्ही दोन वर्षांपूर्वीच आभार मानले. मग आज नव्याने @OfficeofUT काय घोषणा करत आहेत?
बर निर्णय @Dev_Fadnavis सरकारने घेतला होता तर दोन वर्ष अंमलबजावणी का नाही केली? pic.twitter.com/89XK2MnGH4— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 1, 2022
भाजप-शिवसेना सत्तेत असतांना आदित्य ठाकरेंनी केलेले ट्विट उपाध्ये यांनी शेअर केले आहे. ८ मार्च २०१९ म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे ट्विट असून त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची वचनपूर्ती असे म्हणत ५०० फुटापर्यंतची कर्जमाफी संबंधित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार मानले होते. दरम्यान, “नेमकं खरे कोण ? तुम्ही की उद्धव ठाकरे ? कारण दोन वर्षापूर्वीच तुम्ही आभार मानले होते”, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- “१० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाला…”,अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- ठाण्यात मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबीरास प्रारंभ
- विराट कोहलीच्या कर्णधारपदावर राहुल द्रविडची मोठी प्रतिक्रिया
- लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला- प्रविण दरेकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<