आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर त्यांनी वैजापूर येथील चिंतन बैठकीला हजेरी लावली होती. वैजापूरला येताना सुप्रिया ताईंना रस्त्यावरचे खड्डे दिसले नाही का, असा सवाल भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

तरुण भारतने दिलेल्या वृत्तानुसार,भाजप सरकारच्या काळात जिथे जाईल तिथे रस्त्यावरच्या खडड्यांचा सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचा सेल्फी का नाही घेतला नाही, असा सवाल औरंगाबादचे भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांडोगे यांनी केला आहे.

Loading...

शिवसेनेने जनादेशाचा अपमान करून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. तीन पक्षांची महाविकास आघाडी नसून महाराष्ट्र भकास आघाडी आहे, अशी खोचक टीका दांगोडे यांनी केली आहे.दरम्यान, भाजप सरकार सत्तेत असताना सुप्रिया सुळे यांनी मोठा अकांड-तांडव केला होता. सोशल मिडीयावर ‘सेल्फी विथ खड्डे’ या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री व सार्वजनिक बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील राज्यात एक हि खड्डा दिसणार नाही अशी घोषणा केली होती. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटील ह्यांनी दिलेल्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे ह्यांच्या ह्या सेल्फी ला महत्व प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्यातील कात्रज- उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढले होते . सुप्रिया सुळेंच्या ह्या ट्विट खाली आता राज्यभरातून अनेक लोक खड्ड्यांसोबत सेल्फी काढून व्यथा मांडल्या होत्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका