नगरमध्ये राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग, भाजपला मोठा धक्का

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अहमदनगरमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव पिचड यांना हरवण्यासाठी अनेक भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यात भाजप जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, सुनीता भांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

या नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने वैभव पिचड आणि भाजपला मठ धक्का बसला आहे. वैभव पिचड हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर अकोल्यातून निवडून आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला आहे. त्यामुळे पिचड यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या