भाजपमध्ये पंकजांचे कुणीही ऐकत नाही ; पंकजा समर्थकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

pankaja munde

टीम महाराष्ट्र देशा: भाजपमध्ये पंकजां मुंडेंच कुणीही ऐकत नाही, अशातच त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना हाताशी धरायचे सोडून दिले आहे, नव्या कार्यकर्त्यांना महत्व देण्यास सुरुवात केली आहे. या स्तिथित आता भाजपमध्ये काम करणे अवघड झाल्याची खंत व्यक्त करत बीड मधील भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे आणि एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय असणारे दादासाहेब मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. पक्षातील अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आवक जावक सुरु झाली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी स्वपक्षावर टीका केली असल्याचं पहावयास मिळालं आहे. अशातच बीडमध्ये भाजपचे नेते दादासाहेब मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने बीडमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.