… तर तोंड काळं करील; भाजप नेत्याची सरकारी कर्मचाऱ्याला धमकी

इंदूर : भाजपा नेते सध्या वादग्रस वक्तव्यावरून चांगलेच चर्चेत येतं आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते शर्मा यांनी सीतेचा जन्म टेस्ट ट्युब बेबीच्या साह्यातून झाला असल्याचं वक्तव्य करून, वाद ओढून घेतला होता. हा वाद ताजा असतानाच आणखी एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते जगन्नाथ सिंह रघुवंशी यांनी राज्य विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. याचा व्हिडिओ सध्य सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रघुवंशी सरकारी कर्मचाऱ्याला तोंड काळे करण्याची धमकी देताना दिसत आहेत.

‘तुम्ही माझ्या दयेवर इथे जगत आहात. अन्यथा मी तुमचे तोंड काळे केले असते” असे रघुवंशी यांनी धमकावले. तोंड काळे करेन आणि जोड्याने हाणेन अशी भाषा भाजपा नेत्याने वापरली आहे. या व्हिडिओवरुन रघुवंशी यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. कर्मचाऱ्याने तुमच्यावर चार लाखांचे विद्युत बिल थकित असल्याचे सांगितल्यानंतर रघुवंशी कर्मचाऱ्यावर मोठमोठ्याने ओरडताना आणि शिवीगाळ करत असतना या व्हिडिओत दिसत आहेत.