पक्षात येणाऱ्या प्रत्येक आमदाराला तिकीट देणे शक्य नाही – गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा :  भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक आमदाराला तिकीट देणे शक्य नाही. असे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. एका वृत्तावाहीनिशी ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरवातही केली आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत, तसेच विखे यांच्यासोबत कॉंग्रेसचे अनेक आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Loading...

तसेच, काही दिवसांपूर्वी विखे पाटील आणि कॉंग्रेसचे काही आमदार यांची विखेंच्या निवासस्थानी बैठक झाली होती, त्या बैठकीत भाजपमध्ये आमचे भवितव्य काय असेल, भाजप आम्हाला तिकीट देईल का ? असा सवाल कॉंग्रस आमदारांनी केला होता.  यासंदर्भात त्यांना विचारले असता, पक्षात येणाऱ्या प्रत्येक आमदारांना आम्ही तिकीट देऊ शकणार नाही. कारण आमचीही त्या-त्या ठिकाणी लोकं आहेत. मात्र, जो शब्द मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्यांना दिलाय तो आम्ही पाळू असे महाजन यांनी म्हंटले.

याचबरोबर, पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला मंत्रीच करु असं नाही, राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे, त्यांना कुठलं मंत्रिपद द्यायचं, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....