एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ; नवाब मालिकांचा दावा

bjp-leader-eknath-khadse-join-ncp-say-nawab-malik-

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून स्वपक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होत आहे त्यात राज्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच बोलल जात आहे. या मंचावर एकनाथ खडसे असतील तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती सध्या झालेली आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष सोडण्यास त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे त्यामुळे खडसेंकडून पक्ष सोडण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर भाजपच्या अंतर्गत वादातून एकनाथ खडसेंना गुंतवल गेल असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतना दिली आहे.

दरम्यान, स्वपक्षातील एकनाथ खडसेंचे शत्रू समजले जाणारे गिरीश महाजन यांनी ‘जास्त बोलणाऱ्याचे काय हाल होतात’ असा अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला होता.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी भाजपला लक्ष केले होते तेव्हाच सभागृहात एकनाथ खडे यांची अजित पवारांशी जवळकी वाढल्याची दिसून आली होती. तेव्हा आता भाजपचा ४० वर्षापासूनचा हा शिलेदार विरोधकांच्या खरच गळाला लागतो का हे लवकरच स्पष्ट होईल.