खडसेंवरील खटले मागे घ्या दाऊद चा अंजली दामानियांना फोन ?

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील खटले मागे घेण्यासाठी थेट पाकिस्तानातून धमकी येत असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी केलाय. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा फोन येऊन खटले मागे घ्या अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिल्याचे ट्विट करून अंजली दमानिया यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

Loading...

दमानिया यांनी आपल्याला आलेल्या धमिकीच्या फोन कॉल्स चे स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहेत. ट्रू कॉलर अॅपवर हा क्रमांक ‘दाऊद २’ या नावाने दाखवण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माहिती दिली आहे. सहपोलीस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, जळगावातील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी दामानियांवर अक्षेपाहार्य टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यावरून अंजली दमानिया यांनी मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात खडसेंविरोधात गुन्हा दाखल  केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी