‘त्यांची’ निष्ठा तपासा, आपल्याकडे येतील आणि पूर्वीच्याच पक्षाचं काम करतील – खडसे

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस – राष्ट्रवादीतील अनेक नेते कार्यकर्ते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विरोधकांचा ओढा भाजपकडे वाढल्याने एका बाजूला पक्ष बळकट होत असताना दुसरीकडे चिंता देखील व्यक्त केली जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची निष्ठा तपासा, नाहीतर आपल्याकडे येवून आपल्याच विरोधात काम करतील, असा इशारा दिला आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपच्या बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

पक्षवाढीसाठी इतर पक्षातील नेत्यांना घेणे गरजेचं आहे. परंतु बाहेरील नेते कार्यकर्ते पक्षात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहणे गरजेचं आहे, नाहीतर आपल्या पक्षात प्रवेश केला आणि पूर्वीच्याच पक्षावर निष्ठा असेल तर नुकसान होईल. असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूकीत मोदींकडे पाहून पक्षाला मतदान मिळाले आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा आपणच जिकंणार आहोत. असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या