राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम होणार नाही, मनसेपेक्षा लोकांचा मोदींवर विश्वास -खडसे

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या मैदानात एकही उमेदवार न देता मोदी – शहांच्या विरोधात सभांचा धडाका लावला आहे. राज ठाकरे हे छुप्या पद्धतीने आघाडीला मदत करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Loading...

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील आता राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम होणार नाही, मनसेपेक्षा लोकांचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचं सांगितले आहे. राज ठाकरे हे २०१४ ला वेगळ बोलत होते, आज वेगळ बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, एकनाथ खडसे यांनी कुटुंबियांसह मुक्ताईनगरच्या कोथळीमध्ये मतदान केले, खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेतLoading…


Loading…

Loading...