अजित पवार आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही काळापासून स्वपक्षावर नाराज असणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरु आहेत. अशातच आता खडसे आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार हे एकाच मंचावर आले आहेत.

जळगावमध्ये डॉ सतीश पाटील यांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात खडसे आणि पवार एकाच व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. जळगावमधील सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मात्र गिरीश महाजन हे अनुपस्थित आहेत.

कालच नवाब मलिक यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लगेच आज दोन्ही दिग्गज नेते एकाच मंचावर आल्याने चर्चांना उधान आले आहे. दरम्यान भाषणामध्ये खडसे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.