जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलत भाजप नेत्याने केले ध्वजारोहन, गुन्हा दाखल होणार का?

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १ मे महाराष्ट्रदिनी जिल्ह्यात झेंडावंदनास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध केलेले असतांना देखील पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रमुख व जबाबदार पदाधिकारी यांच्या उपस्थीतीत झेंडावंदन करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

संत एकनाथच्या प्रांगणात १ मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहन करतांना काही फोटो सामाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आले होते, जिल्हाधिकारी यांनी दि. ३० एप्रील रोजी काढलेल्या आदेशात वाढत्या कोरोना संसर्गाचा हवाला देत जिल्ह्यात १ मे रोजी झेंडावंदन करण्यास  प्रतिबंधीत करुन संपुर्ण जिल्ह्याचे झेंडावंदन केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थीतीत  विभागीय आयुक्त कार्यालयात साजरा होणार असल्याचे आदेशात नमुद केले होते.

असे असतांना देखील कारखाना परीसरात जवळपास ११ लोकांच्या उपस्थीतीत झेंडावंदन करण्यात आले, त्याचे काही फोटो सामाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आला, कोरोना संसर्ग शहरापेक्षा ग्रामिण भागात फोफावत असतांना ग्रामिण भागाशी व शेतकऱ्यांशी निगडीत संस्थेने जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलुन असे उपक्रम राबवणे हा प्रकार योग्य नसल्याची प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहे.

झेंडावंदन हे कामगारांच्या हातानी झाले. सुरवातीच्या आदेशात सध्या पद्धतीने झेंडावंदन करण्याचे आदेश होते. नंतरचे आदेश हे उशिरा मिळाले होते. तो पर्यंत हा कार्यक्रम झाला होता. तसेच कारखान्यात झेंडावंदन आम्ही दरवर्षी करतो असे संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या