‘मी पुन्हा येईन…’ फडणवीसांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

टीम महाराष्ट्र देशा : मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर शिवतीर्थावर स्मृतिस्थळी उसळला आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मात्र, या वेळी संतप्त शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विनोद तावडे यांच्यासह शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देत आहेत. तर बऱ्याच नेत्यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

दरम्यान, सकाळपासून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा तांडा शिवतीर्थावर दाखल झाला. शिवसैनिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवतीर्थावर उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना वाहिली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195992388306493440?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195995802721611778?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195995280581128192?s=20

टीम महाराष्ट्र देशा : मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर शिवतीर्थावर स्मृतिस्थळी उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन… पुढे वाचा