मुलायमसिंह ‘रावण’ तर मायावती ‘शूर्पणखा’ भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुजन समाज पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. तब्बल २५ वर्षांनी सपा आणि बसपा एकत्र आल्याने भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच आता भाजप नेते यांनी पातली सोडून टीका करण्यास सुरवात केली आहे.

भाजप नेते आणि मंत्री नंद गोपाल नंदी यांचा टीका करताना तोल सुटला त्यांनी मुलायमसिंह यादव यांना ‘कलियुगातील रावण’ आणि मायावती यांना ‘शूर्पणखा’ म्हटलं आहे. इतकंच नाही तर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान श्रीराम आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना श्रीराम भक्त हनुमानाची उपमा दिली आहे.

You might also like
Comments
Loading...