मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeay) यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना २५ वर्षे भाजपसोबत युतीत सडली, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. या विधानाचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समर्थन केले आहे. बाबरी प्रकरणानंतर देशात शिवसेनेची, बाळासाहेबांची लाट होती, त्यावेळी शिवसेनेने निवडणूक लढवली असती तर, आज देशाचा पंतप्रधान शिवसेनेचा झाला असता, असं संजय राऊत म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, बाबरी प्रकरणानंतर देशात शिवसेना (Shivsena) आणि बाळासाहेब ठाकरे यांची लाट होती. त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, पंजाब आणि अगदी जम्मूमध्ये निवडणुका लढवल्या असत्या तर, उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे देशात आज शिवसेनेचा पंतप्रधान असता. मात्र, भाजपसाठी (BJP) शिवसेनेने ते सोडले. भाजपला देशात विस्तार करू द्या. आम्ही महाराष्ट्रात काम करू, असे त्यावेळी बाळासाहेबांचे म्हणणे होते, असं संजय राऊत म्हणाले.
बाबरी मशिद पतनात शिवसेना सहभागी होती.. शिवसेनेचा सहभाग होता म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या… असा संजय राऊतांनी कबूलीनामा दिलाय….
पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना ?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2022
संजय राऊत यांनी बाबरी प्रकरणावर वक्तव्यं केल्यामुळे आता भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, बाबरी मशिद पतनात शिवसेना सहभागी होती. शिवसेनेचा सहभाग होता म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या, असा संजय राऊतांनी कबूलीनामा दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?, असा प्रश्न देखील त्यांनी महाविकास आघाडीत सोबत असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला प्रश्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या: