‘मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का ?’

‘मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का ?’

chitra wagh -uddhav thackeray

मुंबई : मुसळधार पावसाने कोकणात धुमशान घातले आहे. रत्नागिरीत चिपळूण, पेढे, कर्जत, खेड, संगमेश्वर या ठिकाणी पुरमय स्थिती झाली आहे. तर चिपळूण येथे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पावसामुळे काही ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे कोकणात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ जण बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण कोकण पाण्यात असून प्रशासन परिस्थिती आटोक्यात आणण्यात अपयशी ठरत आहे.

कोकणातील या पूर स्थितीवरून विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर सडकून टीका करायला सुरवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करायला स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले होते. त्याचाच धागा पकडत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का ?’ असा खोचक सवाल केला आहे.

‘राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का ? खरी गरज आता आहे तुमच्या ड्राव्हिंग कौशल्याची मुख्यमंत्री महोदय..’ असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या