मुंबई: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यावरून राजेत राजकारण देखील पेटले. मोर्चे, आंदोलन ही देखील सुरूच आहे. या मुद्द्यावरून भाजप पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी आपापली राजकीय पोळी देखील भाजून घेतली. हे सगळं झाल्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचा निर्णय देखील घेतला. त्यानंतर काही प्रमाणात एसटी बस सुरू झाल्या. मात्र भाजपचे टीका करणं अजूनही सुरूच आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. मविआ सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे. गेल्या २ महिन्यांपासून संपावर असलेल्या ६६,६०७ एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे, मात्र इथे त्यांच्या वेतनाचाच पत्ता नाही, अशा शब्दात चांद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.
मविआ सरकारला आता एसटी कर्मचाऱ्यांची कसलीही पर्वा राहिलेली नाही, असं दिसून येत आहे. गेल्या २ महिन्यांपासून संपावर असलेल्या ६६,६०७ एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा द्याव्यात, अशी आमचीही मागणी आहे, मात्र इथे त्यांच्या वेतनाचाच पत्ता नाही.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 7, 2022
पुढे चंद्रकांत पाटील म्हणतात, वेतन सोडा त्यांना आपले घर सांभाळण्यासाठी रेशनची सुविधादेखील तुम्ही करू शकला नाहीत, अखेर भाजपाने एसटी कर्मचारी (ST Workers) बांधवांसाठी रेशनाची सुविधा केली. सरकारचा हा निष्काळजीपणाचा कारभार कधी संपेल माहीत नाही, मात्र भाजपा सदैव एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वास देखील त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नाही- इकबाल चहल
- आमखास मैदानालगतची ‘ती’ जागा औरंगाबाद महानगरपालिकेची; स्मार्ट सिटीचा दावा
- मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक
- ‘ती’ जागा आयुक्त पांडेय यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विकली; आंबेडकरवादी समितीचा आरोप!
- “बिन बुलाये पाकिस्तान्यांसोबत बिर्याणी खायला भीती नाही वाटत पण..” भाई जगताप यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<