fbpx

एका बाजूला निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग, दुसरीकडे नेत्याची शेतकऱ्याला मारहाण

टीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभेसाठी भाजप कडून महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवरचं आज जालन्या मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. तर दुसरीकडे भाजपच्या किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी एका शेतकरी कुटुंबातील पुरुष तसेच महिलांना देखील जबर मारहाण केली आहे.

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा या गावात ही घटना घडली असून शेतकरी विठ्ठल खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याचा रावसाहेब भवरांवर आरोप केला आहे.दरम्यान रावसाहेब भवर आणि विठ्ठल खांडेभराड यांच्यात 28 एकर जमिनीवरुन वाद सुरु होता. याच जमिनीवर विहीर खोदण्यासाठी रावसाहेब भवर गुंडांसह शेतात जेसीबी घेऊन आले होते. मात्र त्यांना विरोध केला असता रावसाहेब भवर यांनी मारहाण केली असल्याचा आरोप विठ्ठल खांडेभराड यांच्या पत्नीने केला आहे.

या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकमेकांन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून रावसाहेब भवर यांच्यासह 11 जणांवर विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.