दोनच बलात्कार झालेत, इतकं मोठं काही झालेलं नाही ; अजून एक भाजप मंत्री बरळला

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते आणि मंत्री यांच्यात संवेदना शिल्लक राहिली नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचारात वाढ होत असताना भाजप नेत्यांच्या वाचाळ वक्तव्यात सुद्धा वाढ होत आहे. यातच भर म्हणून केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री अश्विनी चौबे यांनी यांनी अतिशय संतापजनक वक्तव्य केल आहे.

बनारसमध्ये जेव्हा पत्रकारांनी त्यांना देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांसंबंधी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटलं की, ‘यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. एक दोन घटना झाल्या असतील ज्यावर कारवाई सुरु आहे. त्यात काय मोठी गोष्ट. कठोर कारवाई केली जात आहे. तुम्ही पाहिलं असेल की बलात्कारासंबंधी कायद्याला पंतप्रधानांना किती गांभीर्याने घेतलं आहे. परदेशातून आल्यालवर त्यांनी अध्यादेश काढला. कठोर शिक्षा मिळावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे’.

You might also like
Comments
Loading...