डॉक्टरांच्या वेतनासंदर्भात शेलारांनी मांडल्या व्यथा; मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर केली टीका

shelar

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी डॉक्टरांनी वेतनासंदर्भात मांडलेल्या व्यथा असलेले व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर तिखट शब्दात टीका केली आहे.

‘33,441कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांना दरमहा केवळ, 14 हजार 800 असे तुटपुंजे मानधन दिले जातेय??? ऐका या डॉक्टरांच्या व्यथा, पालिकेतील सत्ताधिशांच्या नाकर्तेपणाच्या कथा,’ असं ट्विट शेलार यांनी केलं आहे.

तसेच उद्धव ठाकरे सरकार हे कोरानाचं संकट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. हे संकट हाताळण्याची या सरकारची क्षमता नाही. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणी खा. नारायण राणे यांनी केली आहे.

दरम्यान,कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार निष्क्रिय आहे, असा आरोप भाजप वारंवार करत आहे. मात्र भाजपच्या या आरोपाचा कोणताच परिणाम आम्हाला होत नसल्याचं सत्ताधारी दाखवत आहेत. उलट भाजप या संकटात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बॅंका राज्य सरकारचे ऐकून शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज देतील का?

महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल – राऊत

#covid_19 : आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी केली ‘कोरोना’वर मात

केंद्राच्या पॅकेजला ‘आत्मनिर्भर’ हे केवळ गोंडस नाव, यातून दिलासा मिळणे अशक्य : चव्हाण