‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ – आशिष शेलार

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहरातील अनेक ठिणाकी पाणी साचले आहे. यावर निशाना साधत भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’, असं म्हणत शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. या निवडणुकीसाठी आमदार आशिष शेलार मतदान करण्यासाठी आले होते. मुंबईत सकाळापासून जोरदार पाऊस सुरु आहे, त्याचा परिणाम मतदानावर होत आहे.

अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्तेत राहून करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी पळून दाखवलं आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला यावेळी लगावला.