भाजपची उद्या अखेरची मेगाभारती, ‘या’ दोन बड्या नेत्यांचा होणार भाजपात प्रवेश

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्याच अनुषंगाने उद्याही भाजपमध्ये मेगा भारती होणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात प्रवेश करणार आहेत. ही भाजपची अखेरची मेगाभरती असल्याचं सांगितल जात आहे.

नारायण राणे आपल्या पक्षा सह उद्या भाजपात विलीन होणार आहेत. गेले काही दिवस नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती. अनेक बैठका आणि गाठीभेटी नंतर उद्या नारायण राणे भाजपात प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातही भाजपची ताकद चांगलीचं वाढणार आहे. तसेच कॉंग्रेसचे मुंबईचे बडे नेते कृपाशंकर सिंह हे ही उद्या भाजपात प्रवेश करत आहेत. त्यामुळे भाजप आता मुंबईतही आपला स्थान मजबूत करत आहे.

दरम्यान गेले काही दिवस कृपाशंकर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणात असल्याची चर्चा होती. तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कृपाशंकर सिंह यांची चांगलीच जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी कृपाशंकर सिंह यांच्या घरी गेले होते. त्यामुळे कृपाशंकर सिंह हे आता भाजपवासी होणार हे जाहीर झालेच होते केवळ औपचारिकता बाकी होती, असे म्हंटले जात आहे.