‘उपवास का उपहास’ भाजपने उडवली राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षातर्फे देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचे योजिले होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजघाटावर येऊन सकाळी १० वाजता उपोषणाला बसतील असे सांगण्यात आले. मात्र १२ वाजले तरी राहुल गांधींचा राजघाटावर पत्ता नव्हता. दरम्यान, भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली उडवली आहे.

भाजपच्या अकाऊंट वरून कॉंग्रेस नेत्यांच्या हॉटेलमध्ये जेवतानाचा फोटो शेयर करण्यात आला. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये जेवणारे कॉंग्रेस कार्यकर्ते आणि उपोषणाला बसलेले कार्यकर्ते यांनी सारखा ड्रेस परिधान केलेले आहेत. त्यामुळे आधी पोटभर जेवण करून कॉंग्रेसनेते उपोषणाला बसले का ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, या छायाचित्रात छोल भटुरेवर आडवा हात मारणारे काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी हे छायाचित्र सकाळी आठ पूर्वीचे असल्याचे सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

You might also like
Comments
Loading...