fbpx

काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला भाजपने झुलवत ठेवले- खा.सुप्रिया सुळे

Rane-supriya-sule

चोपडा: हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून, चोपडा येथे तेराव्या सभेत बोलत असतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी  अनेक राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले. भाजप नेहमीच चांगल्या नेत्यांचा कार्यक्रम करते. असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसेंना आधार दिला तर ‘सध्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला भाजपने आपल्यात घेतले आणि आता झुलवत ठेवले आहे’. असे नारायण राणे यांचे नाव न घेता वक्तव्य केले.

नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर स्वताचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला. भाजपने मंत्रीपदाच गाजर दाखवत यशस्वी राजकीय खेळी केली. मात्र राणेंना मंत्री मंडळात स्थान देण्याच वचन भाजप विसरले कि काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नारायण राणे यांनी सुद्धा जाहीर सभेत मंत्रीपद मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, हल्लाबोल यात्रेत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, एखादा चांगला नेता असेल तर त्याची राजकारणातील कारकिर्द कशी संपवावी, हे भाजपला चांगले माहित आहे. ‘सध्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला भाजपने आपल्यात घेतले आणि आता झुलवत ठेवले आहे’. याआधी भाजपने जळगावमधील स्वतःच्या नेत्याचाही असाच कार्यक्रम केला होता, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.