कर्नाटकाचा पेपर भाजपने फोडला; निवडणूक आयोगाआधी जाहीर केली निवडणुकीची तारीख

टीम महाराष्ट्र देशा: भाजपची सत्ता असणाऱ्या केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार विरोधीपक्षाकडून कायम केली जाते. याच चित्र आज कर्नाटक विधानसभा निवडणुका तारखा जाहीर करण्यावरून दिसत आहे.

निवडणूक आयोगाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत कर्नाटक विधानसभेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र, आयोगाकडून तारखा जाहीर होण्याआधीच भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणूक मतदान आणि निकालाच्या तारखा सोशल मीडियावर परस्पर जाहीर करून टाकल्या, मालवीय यांचे ट्विट काही क्षणातच व्हायरल झाले असून निवडणूक आयोगाआधी मालवीय यांना तारखा कळल्याच कशा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२२४ विधनासभा मतदारसंघ असणाऱ्या कर्नाटकमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे तर १५ मे रोजी मतमोजणी घेतली जाणार असल्याच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी आज सकाळी 11 च्या सुमारास पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या. दरम्यान रावत यांनी या पत्रकार परिषदेत तारखा जाहीर करण्यापूर्वीच अमित मालवीय यांनी निवडणुकांच्या तारखा ट्विट केल्या. त्यामुळे निवडणुका आयोगाने तारखा जाहीर केल्या नसतानाही मालवीय यांना त्या कळल्याच कशा हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान मालवीय यांनी जाहीर केल्याप्रमाणे मतदानाची तारीख ही १२ मेच असून निकालाची तारीख मात्र १८ नसून १५ आहे

You might also like
Comments
Loading...