कर्नाटकातील कॉंग्रेस – जेडीएस सरकार पाडण्यासाठी भाजप पैशाचा वापर करत आहे : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कॉंग्रेस – जेडीएसचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस – जेडीएस सरकार ची जागा ही भाजप सरकार घेणार असल्यची शक्यता आहे. यावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर होत असल्याचा, आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Loading...

यावेळी राहुल गांधी म्हणाले की,कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून धनशक्तीचा वापर सुरू आहे. याआधी पूर्वोत्तर भारतामध्येही त्यांनी याचप्रकारे सत्तांतर घडवून आणल्याचे आपण पाहिले आहे. भाजपकडे सत्ता आहे, पैसा आहे. त्यामुळे त्याचा ते दुरुपयोग करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

दरम्यान कानडी नाट्याच्या तिसऱ्या अंकाला सुरवात झाली आहे. सुप्रीम कोर्टाने आज कर्नाटकच्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्याच सांगितल आहे. तर मंगळवार पर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ असेल, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांचे राजीनामे हे अडकले आहेत.Loading…


Loading…

Loading...