अली बाबा चाळीस चोराच दुकान जास्त दिवस चालणार नाही : शत्रुघ्न सिन्हाचा भाजपला टोला

पुणे : देशातील जनता आज निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच काय झालं हा प्रश्न आम्हाला विचारत आहेत. आपण सगळे भारतीय आहोत लोकांना जाती-जातींमध्ये भडकवन आता बंद करायला हवं. नाहीतर अली बाबा चाळीस चोरच दुकान जास्त दिवस चालणार नाही म्हणत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाण साधला आहे. पुण्यामध्ये आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. तुमच्यात अहंकार आणि घमेंड असेल तर ती तुम्हाला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही असा खोचक टोलाही यावेळी त्यांना लगावला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मला खूप मान देत असल्याचं मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या विषयांवर माझी त्यांच्याशी चर्चा होत होती. मात्र अकस्मातपणे त्यांचं निधन झालं. त्या असत्या तर मी काँग्रेसमध्येच असतो म्हणत सिन्हा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. इथे कोणीही पर्मनंट नाहींये त्यामुळे परिवर्तन तर होणारच असल्याचं म्हणत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाण साधला. आज देश विदेशातील मोठं मोठी भाषणे दिली जातात, मात्र आता देशातील लोकांना भाषण नाही राशनची गरज असल्याचंही ते म्हणाले