मुंबई : मोदी सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. परंतु, शेतकरी विरोधी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करण्य़ाची भाषा मोदी सरकार करत असताना त्याचवेळी शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले जातात. या शेतकऱ्यांसोबत काँग्रेस भक्कमपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठे बळ देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भंडारामध्ये काल काँग्रेसने भव्य बैलगाडी व टॅक्टर रॅली काढली. या रॅलीला नाना पटोले संबोधित करत होते.
पटोले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेत आले आज सहा वर्षे झाली तरी त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट केले नाही आणि शेतमालाला दीडपट भावही दिला नाही उलट शेतकऱ्याला मिळणारा हमी भाव या नवीन कायदे आणून काढून घेतला. शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणून भाजपाने बदनाम केले.
२६ जानेवारीला लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारा व्यक्ती हा भाजपाचाच होता. त्याला भाजपानेच मोकळीक दिली आणि त्याचे खापर शेतकऱ्यांवर फोडले. आतापर्यंत २०० शेतकरी शहीद झाले, तरी मोदी सरकारला अजून जाग आली नाही. शेतकऱ्यांचे आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार?
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- ‘१ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल’
- सरकार आपल्याच आमदारांना घाबरतंय ? फडणवीसांच्या टीकेवर अजितदादांचं रोखठोक उत्तर
- ‘मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही’