‘भाजपा ही फेकू पार्टी; एप्रिल फुलच्या दिवशी भाजप स्थापना दिन म्हणून साजरा करावा’

टीम महाराष्ट्र देशा – भाजपा ही फेकू पार्टी आहे. मागच्या वेळी यांनी १५ लाखाचा जुमला फेकला, आता २० लाखांचाही फेकतील. यांचा काही नेम नाही. मी भाजपाल एक सल्ला देईन की त्यांनी भाजपचा स्थापना दिन आणि मोदी दिन (फेकू दिन) एक एप्रिललाच साजरा करावा. तुमच्या वर्तणुकीला अगदी साजेसा दिवस असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते अहमदनगरचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत दरम्यान बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणाले, सपनोंके सौदागर मोदी वर्ध्यात येऊन भर उन्हात आश्वासनांचा पाऊस पाडून गेले. जेमतेम उपस्थिती असलेल्या या सेभेने मोदींना पराभवाचे चटके दिले. महाराष्ट्रात येऊन आदरणीय पवार साहेबांच्या घरावर वाच्यता करण्यापेक्षा त्यांनी स्वप्रपंचाची जाबाबदारी घ्यावी. अशी टीका करणं आमच्या संस्कृतीत नाही.

काल एका सभेत भाजपाचे ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष बदलूंना पाडा असे आवाहन केले. मी गडकरींच्या म्हणण्याशी सहमत आहे. आपल्या मूळ पक्षाशी गद्दारी करणाऱ्या व या निवडणुकीत भाजप-सेनेच्या तिकिटावर उभे असलेल्या प्रत्येक पक्षबदलूला धडा शिकवूयात. त्यात नगरचे भाजपचे उमेदवार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

2 Comments

Click here to post a comment