मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या रणनीती बद्दल जनतेशी संवाद साधत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या रणनीती बद्दल संवाद साधला आहे.
महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार संपर्कात असल्याचा भ्रम भाजप पसरवत आहे. अशा प्रकारे कितीही भ्रम निर्माण केला आणि अफवा पसरवल्या तरी त्यांना फळ मिळणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या: