fbpx

भाजप निर्लज्ज, एक वेळ कॉंग्रेस परवडली परंतु भाजप नकोच; संजय राउत

संजय राऊत

जळगाव : भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज पक्ष आहे. परंतु आम्ही नाईलाजास्तव सत्तेत , एक वेळ कॉंग्रेस परवडली परंतु भाजप नकोच असा दणदणीत आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने गुजरात निवडणुकीत वाटण्यासाठी भाजपने तब्बल साडेचार हजार कोटी वापरले. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी या सरकारजवळ पैसा नाही. असे मत संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकित व्यक्त केले.

काय म्हणाले संजय राउत?
शिवसेना हा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस प्रमाणे थापड्यांचा पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाकडे गुजरात निवडणुकीत खर्च करण्यासाठी, मते विकत घेण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपये आहेत. मात्र सामान्यांच्या प्रश्नांसाठी पैसे नाहीत. एकवेळ कॉंग्रेसवाले परवडले पण हे भारतीय जनता पक्षाचे नेते नकोत. पैशांची मस्ती फार काळ चालत नाही. गुजरात मध्ये हे दिसून आले आहे. शेतकऱ्यांची कामे करून घेण्यासाठी आम्ही नाईलाजास्तव भाजपसोबत सत्तेत आहोत.